Thursday, April 1, 2010

चांदणं

११ .३० वाजले असतील .आज फ़क्त ३ चांदण्या आणी चंद्र दीसत होता .तीनही चांदण्या चांगल्या मोठ्या होत्या.चंद्रप्रकशामुळं त्याच्या आजुबाजुला एकही चांदनी दीसत नव्हती .खुप वेळ त्या चौघांकड़ं पाहत होतो .आकाश भरलेल वाटत नव्हत .तस मला पूर्ण मोकळ आकाशही खुप आवडत .पण ते दीवासाचं .या क्शीतीजापासुन त्या क्शीतीजापर्यंत पूर्ण नीळ .तेंव्हा तीथ सुर्यही नको वाटतो .रात्री मात्र आकाश चंदंयानी पूर्ण भरलेलेच हव .म्हणजे ते असतच .हा वीचार मनात आला अन आधी मोकल्या दीसनार्या जागेकड़ टक लावून पाहू लागलो .गम्मत म्हणजे मला अनेक बारीक़ चांदण्या लुक्लुक्ताना दीसु लागल्या .सर्व मोकल्या जागी पाहू लागलो .आणी मग मोकली जागाच सापडेना .भास व्हावा त्याप्रमाण चांदण्या दिसयाच्या अन परत गायब .असा खेल होता तो .मला खर्च चांदण्या दिसताहेत का मला खर्च भास होतोय ,या फंदात मी पडलो नाही .मग चंद्राच्या आजुबाजुला पाहू लागलो .पण कही नाही दीसल. चंद्राचा उगाचच राग आला .अमावस्येला उरलेल्या चांदण्या पहायच ठरवल .बर झाल आपल्याला गुरु -शनी सारखे १० -१२ चंद्र नाहीत .म्हनुनच आपला चंद्र जरा महत्त्व टिकवून आहे .नाही तर आमवास्येची रात्र हा प्रकारच माहीत नसता .अडीच -तीनला परत जाग आली .मघाशी बाजूला असणारी लख्ख चांदनी आता डोक्यावर आली होती .चन्द्र प्रकाश दीसत होता .चंद्र दीसत नव्हता .खुप सरे ढग हळु हळु वहात होते .

आज खुप दीवासंनी मनमोकल आकाश पाहील .त्या नादात गाढ़ झोप येत नसल्यचाही काही वाटल नाही अन त्या अगणीत कुत्र्यांच अनंत कल भुन्कंयाचाही काही वाटल नाही .

Sunday, March 28, 2010

Three of Us

कालच एका lecture मधे एक film पाहीली . ‘Three Of Us’. वळूवाल्या उमेश कुलकर्णींनं तयार केलीय .कालावधी १५ ते २० मी .हा माणूस कशावरही चांगली film बनवू शकतो .

पुण्यातल एक कुटुंब .एकुण तीघ .मुलगा ३५ -४० वर्षांचा .अपंग .slow.सर्व काम पायानी करतो .दाढ़ी , दात घासन ,भांग पाडणं इ .इ .आई आंघोळ कपडे घालून देते .वडील paper वीक्रेते .सकाळीच वडील कामाला जातात .आई त्याला चहा बशीतुन गार करून देते .नंतर याची दाढ़ी वगैरे .मग आई आंघोळ घालून देते .पुढच हा आवरतो .building मधला एखादा छोटा मुलगा येउन थोडा वेळ खेलुन जातो .बाकी हा गादीवर पडल्या पडल्या जेवढ दीसेल ते सगळ पाहत असतो .अशी दीवस्भ्राची काम झाली की संध्याकाळी तीघ मिळून नदीकाठी फिरायला जातात .मुलाची wheel-chair आहे .मग रात्रि वडील खाली आणी तो आणी आई पलंगावर ज़ोपतात .एकमेकांच्या चहर्यकडे पाय करून .रात्रि मधेच कधीतरी हा आपले हातच असलेले पाय आईच्या गालावरून फिरवतो . मग परत सकल होते .

या film मधे या तिघांचा एक दिवस दाखवला आहे ।आपल वातावरण इतरांपेक्षा वेगल असून आपण कुणीतरी odd किंवा special आहोत असा मात्र कुठेच भाव नाही . ना आनंद ना दुःख . सगळ सहज .

Thursday, March 25, 2010

बापट

बापट .वय फ़क्त ८४ .मूळ कोक्णाताले .पण गेली ७ पीढया पुण्यातच राहीलेले .पूर्वज पेशव्यांच्या दरबराताले .ब्राह्मन असल्याचा ,R.S.S.चे असल्याचा अभीमान .अहंकार नसावा .(बोलताना तस जाणवल नाही ) रोज संध्याकाळी बालगंधर्व (कार्यक्रम free असेल तर ), पेठांमधिल देवळ ,व्याख्यानमाला , कलाप्रदर्शन जीथ म्हणून वेळ घालवता येइल , तीथ हजेरी .रोज सकाळी योगासन करत असल्यान तब्येत उत्तम.गुहेत फ़क्त ३ दात असेल तरी बोलण्याची हौस दांडगी .जमेल तशी समज्सेवाही करतात .कोणाला जेवायला घाल ,कोणाच्या शालेची फी भर असल काही काही .बापटांच देशावर प्रेम आहे . देशासमोर्च्या प्रश्नांनी त्यांनाही अस्वस्थ केलय .पण ‘बापट ’ असल्यान ती अस्वस्थता उपरोधीक आहे .या देश प्रश्नांवर कधी काली कामही केल असेल .कारन काय केल्यान काय होइल याची त्यांना जाणीव आहे .सध्या नीदान इतरांना त्या प्रश्नांची ओळख तरी करून देत हो ते .जवळ जवळ पौन तास बोलून बपतान्नी अचानक वीशयच बदलला .होणारी तगमग सहन होत नव्हती , म्हणून असेल ।थोड्या वेळान माझा इतका वेळ घेतल्या बद्दल माझी माफ़ी मागुन (का मला लाजवुन ?)बापट नीघून गेले .

एवढा वेळ बोलूनही बापट हा मानुस काही कल्ला नाही .कदाचित माझी समजण्याची ताकदाच कमी असेल .बाकी वर्षानुवर्षे बरोबर राहून आपल्याला जव्ळची मानस समजत नाहीत .त्यांच्यावर एका वीशीष्ट स्वभावाचा शीक्का मारल्यावर त्यांच्या प्रत्येक कृतीकडे एकाच नजरेतून पाहून आपण आपलच कीती नुकसान करून घेतो ।इथ पौन -एक तासात काय मानुस कळनार ? आणी तसही ‘बापट ’लोक कलायला जरा अवघडच असतात .

Sunday, March 21, 2010

दीर्घ श्वसन

कसल काय अन कसल काय

आता फ़क्त दीर्घ श्वसन .

चला , नीट मांडी घालून बसा

हात समोर , डोळे मीटलेले

लकश फ़क्त खोल आत जाणार्या श्वासावर

हा आवाज कुठून येतोय ?

खाली मारामारी चाललीय का ?

बाईला मारतायेत बहुतेक

शु ………क

लकश कुठाय ? श्वासावर लकश .

कदाचित खाली जाऊन

बाईला मारनार्याचा हात धरता आला असता

पण कसल काय अन कसल काय

आता फ़क्त दीर्घ श्वसन

टाकी बहुतेक overflow झालीय

जाऊ का machine बंद करायला ?

पण मग ते काम माझ्याकडेच लागेल

शीवाय स्गळयान्ना कधी कळणार

अमूल्य अशा त्या पान्याच महत्व

पानी अडवा ! पानी जीरवा !!

कसल काय अन कसल काय

आता फ़क्त दीर्घ श्वसन .

मंदीरात्ला राम की हातातल काम ?

काय गरजेच आहे ?

वत्सा ! अरे कर्मयोग मी फ़क्त

अर्जुनाला चुच्कारान्यासाठी

सांगीतला होता !

तू भजे गोवींद

अन देतोय खावींद

श्वासावर लकश आहे ना ?

चालू दया !

Office मधे boss ओरडतो

मंदीरात भटजी ओरडतो

Police ओरडतो , भीकारी ओरडतो

Library मधल्या त्या शांत शांततेत

टेबला मागचा माणुस ओरडतो

यावेळेस अतीशय उपयुक्त असत

थोर अस ते दीर्घ श्वसन !

हा देह म्हणजे मी नाही

मी म्हणजे हा देह नाही

आयुश्यभ्राचे सगळे घाव

या देहावरच पडायला पाहीजेत

कारण देह तर बदलता येतो

आत्मा चीरंतन आहे

म्हणून या देहाला करू दया श्वसन

आत्म्याच चालू दया दीर्घ श्वसन

हं ! चला पटकन बसा

हात समोर , डोळे मीटलेले ……

Saturday, March 13, 2010

विन्दा गेले.

Friday, March 12, 2010

हरीवंश राय बच्चन -

सुबह सुबह उठकर क्या देखता हूँ की मेरे द्वार पर

खून रंगे हाथों के कई छाप लगे है

और मेरे पत्नीने स्वप्न देखा है

की एक नरकंकाल आधी रात को एक हाथ में

खून की बाल्टी लीये आता है ,

और दूसरा हाथ उसमे डुबोकर हमारे द्वार पर

खून का एक छाप लगाकर चला जाता है

फीर एक दूसरा आता है ,फीर दूसरा , फीर दूसरा -

यह बेगुनाह खून कीसका है ?

क्या उनका , जो सदीयोसे सताए गए

जगह जगह से भगाए गए

दुःख सहने के इतने आधीन हो गए के वीद्रोह के सारे भाव ही खो गए

और जब मौत के मुह में जाने का हुक्म हुआ

नीर्वीरोध चुपचाप चले गए

और उसकी वीषैली सांसोमे घुटकर

सदा के लीये सो गए ?

उनके रक्त की छाप अगर लगनी थी तो

कीसके द्वार पर ?

यह बेजुबान खून कीनका है ?

क्या उनका ,जीन्होंने आत्महन शासन के शीकंजे की पकड़ से

जकड से छूटकर ,उठने का , उभरने का प्रयत्न कीया था

और उन्हें दबाकर , डालकर , कुचलकर

पीस डाला गया -

उनके रक्त की छाप अगर लगनी थी तो

कीसके द्वार पर ?

यह जवान खून कीनका है ?

क्या उनका , जो अपनी मारी का गीत गाते

अपनी आज़ादी का नारा लगाते

हाथ उठाते , पाव बढ़ाते आये थे ,

पर ऐसी चट्टान से टकराकर

अपना सीर फोड़ रहे है

जो न टलती है , न हीलती है , न पीघल्ती है

उनके रक्त की छाप अगर लगनी थी तो

कीसके द्वार पर ?

यह मासूम खून कीनका है ?

क्या उनका , जो अपने श्रम से , धुप में , ताप में , धूली में ,

धुएं में , सनकर काले होकर

अपने सफ़ेद उन स्वामीयों के लीये साफ घर ,साफ नगर

स्वच्छ पथ उठाते रहे बनाते रहे

पर उनपर पाव रखने , उनपर बैठने का मूल्य अपने प्राणों से चुकाते रहे

उनके रक्त की छाप अगर लगनी थी तो

कीसके द्वार पर ?

यह बेपनाह खून कीनका है ?

क्या उनका , तवारीख की एक रेख से

अपने ही वतन में जला एक वतन है

जो बहुमत के आवेश पर , सनक पर ,पागलपन पर

अपराधी ,दंड्य और वध्य करार दीये जाते है

नीर्वास , नीर्धन , नीर्वसन , नीर्मन क़त्ल कीये जाते है

उनके रक्त की छाप अगर लगनी थी तो

कीसके द्वार पर ?

यह बेमालूम खून कीनका है ?

क्या उन सपनों का , जो एक उगते हुए राष्ट्र की

पलकों पर झूले थे ,पुतालीयों में पले थे

पर लोभ ने , स्वार्थ ने , महत्वाकंक्षाने जीनकी आँखे फोड़ दी है

जीनकी गर्दने मरोड़ दी है

उनके रक्त की छाप अगर लगनी थी तो

कीसके द्वार पर ?

लेकीन इस अमानवीय अत्याचार , अन्याय , अनुचीत

अकरणीय अकरुण का दायीत्व कीसने लीया ?

जीसके भी द्वार पर ये छाप लगे

उसने पानी से धुला दीया ,चुने से पुता दीया

कीन्तु कवीद्वार पर छपे ये लगे रहे

जो अनीती -अत्ती की कथा कहे , व्यथा कहे ,

और शब्द्यद्न्य में मनुष्य के कलुष दहे

और मेरी पत्नी ने स्वप्न देखा है

की यह नरकंकाल कवी -कवी के द्वार पर ऐसे ही छपे लगा रहे है

ऐसी ही शब्द्ज्वाला जगा रहे है

Monday, March 1, 2010

एक होता देव ।त्यानी म्हणे सांगुन ठेवल होत की –

‘ मी चरचरात व्यापून उरलेलों आहे .माझी अनंत रुपे आहेत . मी सर्व शक्तिमान आहे . माज्या इतका भारी कोणीच नाही .इतर कोणत्याही देवाची पूजा केल्यास ती मलाच पावते .आम्ही सर्व देव एकच आहोत . पण तू फ़क्त मलाच शरण जा . जो मला जाणत नाही अथवा मानत नाही त्याला पुढील अनंत जन्म नरक यातना भोगाव्या लागतील . माज्या भक्तांवर कही संकट आली तर ती मी त्यांची घेतलेली परीक्षा आहे आणी इतर कोणावर संकट आली तर तो माझा कोप असतो . फ़क्त मी आणी मीच तुम्हाला मुक्ती देऊ शकतो । माज्या दर्शनाला येताना रीक्त येऊ नका . मुळात मी नीरीछ आहे आणी मला अप्राप्य अस काही नाही . पण तुम्ही यथा शक्ती माज्या मंदीरान्ना दान दया . आधी माज्या भक्तांची बौद्धीक पातळी जास्त असल्यान मी त्यांच्या सुखात सुखी होतो . पण आता त्यांची आर्थीक पातळी वाढली , भयाची पातळी वाढली .त्यामुले माज्या सुखातच सुखी रहन्याचा आशीर्वाद मी त्यांना दीलाय . आज काल मी कर्मयोग वगैरे काही सांगत नाही .भरपूर पैशांच दान करून , एखादी महापूजा घालून , कींवा एखाद्या मुकया प्रान्याचा बळी देण्याची धमकी दीली की मी पटकन हात वरती करून मोक्ष देऊन टाकतो .